आपला बीड जिल्हाक्राईम

मटका बुक्कीवर पोलिसांची धाड !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

केज तालुक्यातील विडा येथे पोलिसांनी मटका बुक्कीवर धाड टाकून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला.

केज तालुक्यातील विडा येथील पंडित शिवाजी दूनघव हा इसम विडा-कोरडेवाडी चौकात कल्याण नावाचा जुगार घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना मिळताच त्यांनी बिट जमादार उमेश आघाव यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.

दि.१५ ऑक्टोबर रोजी पोलिस जमादार उमेश आघाव आणि पोलिस नाईक बाळराजे सोनवणे यांनी कारवाई करून पंडित सखाराम दूनघव याला मटका घेत असताना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४६९/२०२२ मुंबई जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करून पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!