वीस दिवसानं पासुन अंबाजोगाई येथील कार्यालय बंद
रस्त्याच्या कामांची गुणवत्ता वार्यावर
केज शहरामधुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग त्या महामार्गाचे तब्बल तीन वर्षापासुन काम एच.पी.एम कपंनीचे सुरू आहे. या रस्त्याचे कामकाज तथा क्वालीटी कंट्रोल करण्यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग विकास महामंडळ यांच्याकडुन मुख्याधिकारी म्हणुन रवि कुमार यांची नियुक्ती केली .
मात्र मुख्याधिकारी रवि कुमार यांच्या ढिसाळ कारभारामुळे राष्ट्रीय महार्गाच्या दोन्ही बाजुने लावली जाणारी झाडे आद्यापर्यंत लावली गेली नाही त्याच बरोबर रस्त्याच्या बाजुने असणाऱ्या गावानंसाठी बनवलेले बस स्टॅन्ड हे अतिशय निकृष्ट पद्धतीचे बसवले आहे तसेच गावानंकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे मात्र गुणवत्ता तपासणारे मुख्याधिकारी रवि कुमार यांनी कसल्याही प्रकारची गुणवत्ता न तपासता सढळ हाताने बिले काढली या संदर्भांतील बातम्या वेळोवेळी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यामूळे मुख्याधिकारी रवि कुमार पाठीमागील २० दिवासानं पासून अंबाजोगाई येथे असणारे कार्यालय बंद करुन करार झाले असल्यामुळे आता सुरु असलेल्या कामांची गुणवंत्ता कोण तपासणार ? जिल्हाधिकारी यावर लक्ष घालणार का ? कंपनीवर तथा मुख्याधिकारी रवि कुमार यांची विभागीय चौकशी लागुन त्यावर कारवाई होणार का? आदि प्रश्न केज- अंबाजोगाईतील नागरीकांना पडले आहेत .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!