आपला जिल्हानिवडणुक

वाघळवाडी – सोमेश्वरनगर गावातील तरुणांनी वचननामा दिला चक्क 100 रुपयांच्या बॉन्डवर ; वचननाम्याची पंचक्रोशीत चर्चा !!!

वादळवार्ता वार्तांकन – बारामती

आपला नेता शब्दाला जागणारा असावा ही प्रत्येक नागरिकाची इच्छा असते , पण फार कमी लोक इलेक्शन दरम्यान दिलेली आश्वासन पाळतात , आपला शब्द खरा करून दाखवतात,अनेकांना तर प्रचारा दरम्यान आपण काय बोललो हे आठवत सुद्धा नाही , त्यामुळे नेत्यांची आश्वासन किती मनावर घेयच अशी स्थिती गावा गावात निर्माण होते.

सविस्तर वृत्त असे कि बारामतीमधील वाघळवाडी – सोमेश्वरनगर येथील लोकांची मनं जाणणाऱ्या एका तरुण सरपंच उमेदवाराने यावर उत्तम तोडगा काढलाय , हे सर्व तरुण निवडणुकीत उतरलेत, लोकांना शब्द ही दिलाय अन तो शब्द खरा करून दाखवणार याचा पुरावा ही दिलाय .

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकी ची रणधुमाळी सुरू आहे, या धुरळ्यात बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावामध्ये एका तरुण तडफदार तरुणाने वचन नामा दिलाय चक्क एका 100 रुपयांच्या स्टॅम्पवर..!!

येत्या 18 डिसेंम्बर रोजी राज्यातील बहुतांश ठिकाणी ग्रामपंचायत निडवणूक आहे, वाघळवाडी मधील स्थानिक पातळीवरील पुढाऱ्यांच्या  कंटाळून गावातील सर्व तरुण एकत्र येऊन नवीन पॅनल उभा केला अन गावासाठी काही तरी करण्याचा दृष्टीने निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.

त्यांनी 100 रुपयांच्या बॉन्डवर केलेला हा वचन नामा हा 2 पानांचा आहे .

आपण निवडून आलो तर हा वचन नामा आपल्याला बंधन कारक असेल असे सरपंच पदाचे उमेदवार चेतन कुमार सकुंडे यांनी प्रतिनिधीना सांगितले आणि ही आश्वासन सर्व पॅनल कडून पाळली जातील अस त्यांनी सांगितलं.

गावकऱ्यांना हा स्टॅम्प पेपर वर दिलेला वचन नामा आकर्षित करत आहे, पहिल्यांदाच असा वचन नामा गावकरी पाहत आहेत, निवडणूक प्रचाराच्या बदलत्या स्वरूपाची पंचक्रोशीत चर्चा व कौतुक होत आहे..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!