दैनिक वादळवार्ता/बीड
यांत्रिक पर्यावरणामुळे निर्माण झालेला मर्यादेपलीकडील असह्य ध्वनी म्हणजे ध्वनी प्रदूषण. यामुळे मनुष्य किंवा प्राणी जीवनाच्या कृती विस्कळीत होतात किंवा त्यांचा समतोल बिघडतो यामुळे मनुष्यास वेगवेगळ्या मानसीक आजारांचा सामना करावा लागतो.
याबाबत वृत्त असे की बीड शहरांमध्ये विचित्र आवाज करणारे मोटरसायकलचे सायलेन्सर यामुळे शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले होते .बीड वाहतूक शाखेने दंबग कारवाई करत बुलेट तसेच इतर गाड्यांचे विचित्र आवाज करणारे,आणि दुचाकी वर नंबर ऐवजी काका ,भाऊ, दादा ,मामा आदि मजकूर असणाऱ्या जप्त केलेल्या नंबर प्लेट पोलीस पेट्रोल पंप परिसराच्या आवारात रोड रोलरच्या साहाय्याने नष्ट केल्या आहेत.
यामुळे निश्चित स्वरूपात काही प्रमाणात मोठ्या आवाज करणाऱ्या मोटार सायकल स्वराना व दादा, मामा, भाऊ, काका अश्या असणाऱ्या नंबर प्लेट व तीव्र आवाजाचे सायलेन्सर वापरण्यावरती नक्कीच आळा बसेल .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!