वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब
केज तालुक्यातील नायगाव येथील मांजरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वसंत नायगावकर याचे २०२१ मध्ये कोरोनामुळे यांचे निधन झाले व तसेच संस्थेच्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपला असल्याने धर्मदाय उपायुक्त बीड यांच्या आदेशानुसार आज संस्थेच्या कार्यालयत नवीन कार्यकारिणी संचालक मंडळाची निवडण्यात आली.
वसंत नायगावकर यांनी त्यांनी १९७८ साली नायगाव सारख्या लहान गावात ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी गरिबांच्या मुलांना पण शिकता आले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन त्यांनी मांजरा शिक्षण संस्थेची स्थापना करून त्या अंतर्गंत संतज्ञानेश्वरी विद्यालय व स्वातंत्र्यवीर सावरकर मागासवर्गीय
वस्तीगृहाची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांना घडवित्याचे पुण्यकाम त्यांनी आणि त्याच्या सहकार्यांनी केले आहे.
आज झालेल्या निवडीनुसार संस्थेच्या अध्यक्षपदी छाया कुलकर्णी, उपाध्यक्षपदी सर्जेराव खोडसे तर अलका जोशी कार्यवाह, जगन्नाथ गुजर सहकार्यवाह, ज्ञानोबा शिंदे कोषाध्यक्ष तर माणिक वैरागे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सर्व संचालक मंडळाचा मांजरा शिक्षण संस्थेच्या वतीने नायगावच्या ग्रामपंचायत व ग्रामस्थानच्या वतीने सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी गावातील सर्व जेष्ठ मंडळी, गावकरी तसेत संतज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!