सामाजीक

१९९६ चे वसंत महाविद्यालयांतील विद्यार्थी तब्बल २७ वर्षानी आले एकत्र

मोरया होटेलमध्ये रंगला स्नेहमिलनाचा अनं गुजगोष्टींचा कार्यक्रम

केज । प्रतिनिधी

नोकरी, शिक्षण, बदली अशा कारणास्तव बरेच लोक घर, शहर, नातेवाईक आणि मित्रांपासून दुरावरतात. त्यांना भेटण्यासाठी विशेष वेळ काढण्यासाठी गरज भासते आणि मग सर्वांना एकदाच भेटता यावे यासाठी खटाटोप सुरू होतो. त्यामधूनच गेट टूगेदर ही संकल्पना एखाद्याला सुचते आणि मग डेस्टिनेशन गेट टूगेदरचा प्लॅन ठरतो. त्या प्रमाणेच सन १९९६ रोजीचे वसंत महाविद्यालय केज येथील इयत्ता १० वी वर्गमित्र एकत्र येतात आणि रंगते ती मैत्रीची शालेय जीवनातील सुरेख गुजगोष्टीची मैफील.

याबाबत सविस्तर वृत्त असे केज येथील वसंत महाविद्यालयातील सन १९९६ च्या इयत्ता १० वी मधील वर्गमित्र तब्बल २७ वर्षानी पिसेगाव येथील हॉटेल मोरया येथे सायं ५ वाजता एकत्र आले. या स्नेहमीलनाच्या कार्यक्रमात सुरुवातीच्या टप्पात शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देण्यात आला .

त्यानतर स्नेहभोजन सपन्न झाले. प्रत्येकजन आप आपल्या कार्यात निपून असल्यामुळे आपल्या कार्याचा परिचय देण्यात येऊन पुढील वर्षी भेटण्याचा माणस ठरवत एकमेंकांचा निरोप घेण्यात आला . यामध्ये मोठ्या संख्येने शालेय जीवनातील विद्यार्थी आताचे घनिष्ट मित्र एकत्र आले होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!