आपला बीड जिल्हाआपले केज

दलित मयत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर झाले केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिमसंस्कार

वादळवार्ता – केज

दलित अल्पवयीन मुलीने केज तालुक्यातील डोका गावातील शिवारामधील विहिरीमध्ये एकाच्या जाचास कंटाळुन उडी मारुण आत्महात्या केली. आपली जीवनयात्रा संपवली . याची माहिती यवतमाळ येथील तिच्या कुटुबीयांना मिळताच बीड जिल्ह्यातील केज येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेऊन ” जो पर्यंत आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही व आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत शवविच्छेदन करणार नाहीत असा पवित्रा घेतला ” .

कांही काळासाठी वातवरण तणावाचे झाले. यातच लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले यामुळे केज पोलीसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करूण व त्याला ताब्यात घेतल्यामुळे मयताच्या कुटुंबीयानी शवविच्छेदन करण्यास परवानगी दिली .

त्यामुळे दि. ६ मे रोजी दुपारी सायं ५.३० ते ६ च्या दरम्यान तिसऱ्या दिवशी क्रांतीनगर सार्वजनिक स्मशानभूमी केज येथे कुटुंबीयानंसह केज येथील समाज बांधवाच्या तसेच लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या व केज पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीती मध्ये अगदी शोकाकूल वातावरणात दलित मयत अल्पवयीन मुलीच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!