आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

शिवजयंती निमित्त विद्याधन कोचिंग क्लासेस मध्ये योगा-प्राणायामचे आयोजन

नेहमीच नवीन उपक्रम राबवण्याचा संचालक एम. गिरी सर यांचा माणस

वादळवार्ता – केज

आज 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त केज शहरातील नामांकित विद्याधन कोचिंग क्लासेस केज येथे योग प्रशिक्षिका श्रीमती गुंड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 7 ते 8 यावेळेत योगा-प्राणायाम आयोजित केले होते.शिवजयंतीचे औचित्य साधून नवोपक्रमाचे आयोजन केल्याचे विद्याधन शिक्षण समूहाचे संचालक एम. गिरी सर यांनी सांगितले. यावेळी केज ता. क्रीडा संयोजक विनोद गुंड, श्री. तांबवेश्वर मुलांचे गुरुकुल केजचे संचालक श्री. नेहरकर सर उपस्थित होते.

तसेच योग-प्राणायाम साठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. योगाने शरीर आणि मन प्रसन्न राहते. निरोगी शरीरासाठी योगा आवश्यक असून सर्वांनी योग-प्राणायाम नित्याने करण्याची गरज असल्याचे मत गिरी सर यांनी मांडले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली आणि योग-प्राणायाम नियमित करण्याचा संकल्प केला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!