आपला बीड जिल्हा

कासारवाडी – सोनपेठ रस्त्याची झालीय दैना ; बांधकाम विभागचे अधिकारी लक्षच देईना…. 

रस्त्याचा बनलाय तलाव, वाहने पलटली, गुडघ्याभर पाण्यातून करावा लागतो प्रवास 

कासारवाडी ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव…. 

वादळवार्ता वार्तांकन – महादेव गिते

रस्ता किती खराब असु शकतो याचे उत्तम उदाहरण कासारवाडी – सोनपेठ रस्ता पाहिल्यावर समजते.

हा रस्ता म्हणजे रस्ता राहिला नुसन एक प्रकारे लघू तलावच बनला आहे.हि अवस्था परळी तालुक्यातील सिरसाळा नजीक च्या कासारवाडी – सोनपेठ ला जोडणारा मुख्य मार्गाची आहे.एकेकाळी माजलगाव- पोहनेर- कासारवाडी ते सोनपेठ ला जोडणारा हा प्रमुख मार्ग होता व आजही आहे.

कासारवाडी पासुन २/३ किमी पर्यंतचा हा मार्ग पुर्णत उखरला आहे . उखरल्या मुळे मोठे मोठे भगदाड व अनेक ठिकाणी रस्ता ५० /१०० फूट लांब जमीन लेवल पासुन खाली एक दिड फुटा पर्यंत दबला आहे. या मुळे पावसाचे पाणी बाहेर वाहून जायला मार्गच नाही.

थेट पाणी ह्या रस्त्यावरच तलावा प्रमाणे साचत आहे. ह्या मार्गावरुन दुचाकी चालवणे देखील जवळपास अशक्य असेच आहे. अनेक मोठी हायवा, ट्रक, टॅम्पो सारखी वाहने यात पलटली आहेत . ट्रॅक्टर फसत आहेत. गाडी सह बैल ह्या पाण्यातून जायला दचकतात .शेतकरी, शेतमजूर यांना येथून जातांना खुप मोठी रोजच्या रोज कसरत करावी लागत आहे.

हा प्रश्न केवळ रामेवाडी/कासारवाडी गावच्या ग्रामस्थांचा नाही तर ममदापूर, बोरखेड ह्या गावच्या लोकांचा देखील हा प्रश्न आहे. संबंधित विभाग अधिकाऱ्यांनी रस्त्याचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे.

● रस्ता सर्वांसाठी आहे, काम सुरु होऊ देणे गरजेचे :

       सदरचा रस्ता प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर असल्याचे समजते आहे. ४.५ मिटर रुंदी चे काम होणार होते पंरतु स्थानिक काही शेतकऱ्यांच्या कारणास्तव हे काम होऊ शकले नाही असे समजते आहे. हा मुख्य मार्ग असल्याने सदर रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. रहदारीला खुप अडचण होत आहे शेतकरी,शेतमजूर व वाट सरुंचे खराब रस्त्या मुळे खुप हाल होत आहेत.सामंजस्याच्या भूमीकेने हे काम करुन घ्यायला हवे असे मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.

● अधिकारी काय करायलेत ? : एवढा गंभीर प्रश्न सदरच्या रस्त्याचा होऊन बसले आहे. वाहने ह्या रस्त्यावर पलटी होत आहेत, अनेक जण जखमी होत आहेत. हे असेच चालू राहिले तर अनेकांना ह्या रस्त्यावर जिव गमवावा लागेल. स्थानिक नागरिक वेळो वेळी रस्त्याचा प्रश्न निदर्शनास आणून देत आहेत. पंरतु तरीही संबधित विभाग/प्रशासन या कडे गांभीर्याने लक्ष देत नाही. रस्त्याचे काम जेंव्हा सुरु होईल तेंव्हा होईल पंरतु सद्या परिस्थीतीनुसार हा रस्ता भरुन घेऊन, डागडुजी करुन घेणे गरजेचे आहे. का कुणाचा जीव जाण्याची वाट पहायची का ? तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा नागरिक अंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!