आपला बीड जिल्हा

MSEB चे वीज कनेक्शन नसताना तब्बल बारा हजार रुपयांचे आले बील

प्रशासनाचा अजब गजब कारभार शेतकरी मात्र बेजार

वादळवार्ता वार्तांकन – बीड

बीड बलगुजार येथील अभिजीत बन्सीधर कदम हे त्यांची वडिलोपार्जीत जमीन वहिती करीत आहेत. त्या ठिकाणी त्यांनी बोअर घेतलेला आहे, तर उत्पन्नवाढीसाठी म्हणुन एम.एस.ई.बी.कडे अर्ज करुन नवीन विद्युत कनेक्शनाची मागणी केली, कागदपत्राची पुर्तता व कोटेशन भरुन देखील आज पर्यंत प्रत्यक्षात विद्युत कनेक्शन देण्यात आलेले नाही.

परंतु दर महिन्याला बिल मात्र गेल्या 7 ते 8 महिन्यापासुन विद्युत बिले देत आहेत. अनेक तक्रारी अर्ज, विनंत्या, समक्ष भेट करुनही काहीही उपयोग झाला नाही, आता तर कहरच गेला माहे ऑक्टोंबरचे बील 12360/- रु 15 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत भरण्याचे बिल दिले व त्या सोबतच कलम 56 नुसार नोटीस दिली यावरुन एम.एस.ई.बी. अर्बन विभागाचा कारभार म्हणुन आंधळ दळतय व कुत्रं पिट खातयं.

 शेती निष्ठक शेतकरी अभिजित कदम यांनी त्यांचे विद्युत मागणीचा अर्ज आय.डी. क्र 36508572 दि.25 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन कनेक्शन बाबत संपुर्ण कागदपत्रासह विद्युत विभागात दाखल केला होता. सर्व सोपस्कार पुर्ण झाल्यानंतर त्यांनी दि.06.01.2022 रोजी विद्युत जोडणीसाठी आवश्यक असलेले कोटेशन हे महामंडळाकडे जमा केले होते, अनेक चकरा मारल्या परंतु अर्बन विभागाने कसल्याही प्रकारची दखल न घेता अंधेर नगरी, चौपट राजा या युक्तीप्रमाणे विद्युत कनेक्शन आजच्या तारखे पर्यंत न देता उलट बील देत गेले व खोटे संदेश पाठवुन मानसिक त्रास दिला या बाबत तक्रारदार शेतकरी यांनी सविस्तर दि.08.04.2022 रोजी लेखी स्वरुपात कार्यकारी अभियंता, सह अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता यांना अनेकवेळा निवेदने दिली पण खुर्चीत बसलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, त्यांनी चुकीच्या पध्दतीने व लुट करण्याच्या हेतुने 12360/- रु चे बिल दिले. वास्तविक पहाता जे बिल दिले त्यावर विद्युत क्रमांक नाही, रिडींग नाही, मिटर व कनेक्शन बाबत कोणतेही सकृत दर्शनी वायरींग शेतकऱ्याच्या शेतात नाही त्यामुळे एक आश्चर्याचा धक्का या शेतकऱ्याला बसला आहे. तक्रारी करुन ही कोणी दखल घेत नाही, अधिकारी व कर्मचारी यांना शेतकऱ्यांना खोटी बिले, अनावश्यक बिले, जास्तीची बिले देवुन आत्महत्या करायला भाग पाडायचे काय ? असा सवाल नागरीकामधुन उपस्थित होत आहे. या प्रकरणात लवकरात लवकर कार्यवाही करावी, खोटे बिलं दिलेले रद्द करावेत व आज पर्यंत विद्युत पुरवठा जोडणी करुन न दिल्यामुळे त्या शेतकऱ्यास बोअरचे पाणी वापरता येत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे ते भरुन देणार आहेत काय ? या बाबत न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार आहे व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांची राहिल असे पत्र शेतकरी अभिजीत कदम यांनी देवुन कळविले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!