आपला बीड जिल्हानैसर्गिक

केज तालुक्यात पाच दिवसापासुन संततधार पावसाने जनजिवन विस्कळीत!

दळणवळणासह बाजार पेठा झाल्या ठप्प! स्थानिक पातळीवर काही शाळांना सुट्या तर मुक्याजणावरांचे बेहाल!;

१२० तास संततधार पाऊस पडत असल्याने प्रशासन झाले अलर्ट
वादळवार्ता प्रतिनिधी – महादेव काळे

या वर्षी जुन महिन्यातील मृग नक्षत्रात केज तालुक्यात कमीअधिक प्रमाणात पावसाने सुरुवात केली. त्यावर बळीराजाने सर्वसमान पेरणी न करता मागेपुढे पेरणी करण्यातआली.

थोड्या आणि कमीअधिक पावसावर तालुक्यात सर्वत्र पिके चांगली आली आहेत. मात्र गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत असुन केज तालुक्यात मात्र १२० तासाचा कालावधी उलटून गेला तरी संततधार पाउस थांबायचे नाव घेत नसल्याने या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असुन दळणवळण पुर्णपणे ठप्प झाले आहे.हा पाउस आणखी काही दिवस असाच सुरू राहिला तर ही धोक्याचीच घंटा असल्याचे बोलले जात असुन प्रशासन मात्र अलर्ट मोडवर आले आहे.

 या बाबत अधिक माहिती अशी की या वर्षीचा पावसाळा अगदी वेळेवर सुरु झाला होता. कमीअधिक पडणाऱ्या पावसावर बळीराजाने काळ्याआईची ओटी भरली पिके चांगली आली. खुरपणी आणि कोळपणी, डुबणाची लगबग सुरू असतानाच आषाढी वारी परतीला आली. आणि पावसाने सुरुवात केली.तेंव्हापासून आजपर्यंत पाऊस उघडण्याचे नाव घेत नसल्याने या पावसामुळे जनजिवन मात्र विस्कळीत झाले असुन बाजारपेठ संपुर्णपणे ठप्प झाली आहे.

तर १ ली १२ वी पर्यंत.च्या शाळांना अद्याप जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली नसुन स्थानिक प्रशासनाने म्हणजे शालेय व्यवस्थापन समितीने त्याठिकाणची परिस्थिती पाहुन निर्णय घ्यावा. असेही सांगण्यात येत आहे. सध्या तालुक्यात पडत असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जमीनीतील पाण्याची पातळी वाढली असून या पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमीनितच मुरत आहे. परंतु त्याची सिमा आता संपली असुन जमीनीत आता पाणि मुरत नसुन ते पाणीआता जमीनीबाहेर निघत असल्याने नदिपात्रातील पाण्यात वाढ होताना दिसत आहे.

हा पाउस जर आणखी काही दिवस असाच राहिला तर मात्र परिस्थिती अवघड होवु शकते. असे जाणकारांचे मत आहे. तर या पाच दिवसाच्या संततधार पावसामुळे मुक्याजणावरांचे मात्र बेहाल होत असुन त्यांना खाण्यासाठी गोठ्याबाहेर काढणे अवघड झाल्याने त्यांचेवर उपासमारीची वेळ आली असुन सुंदर आलेली पिके धोक्यात येतात की काय याची चिंता आता बळीराजाला सतावू लागली आहे.

तर खबरदारी चा उपाय म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर आले असुन सर्व यंत्रना सज्ज ठेवण्यात आले असल्याचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सांगतले आहे.

_______________________________________________

पिक पेरणी पासुन काही दिवस पावसाने दडी मारली होती. परंतु आता सध्या तालुक्यात होत असलेला पाउस पिकासाठी भरपूर झाला असुन यापुढेही जर संततधार किंवा मोठा पाऊस असाच लागुन राहिला तर परिस्थिती गंभीर होवु शकते. त्यामुळे खबरदारीचा ऊपाय म्हणून आम्ही प्रत्येक गावातील ठराविक लोकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून नैसर्गिक आपत्ती वेळी ते आम्हाला माहिती देणार आहेत. तर आमचे स्तरावरुन महसुल मंडळासह सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.

मा.श्री. दुलाजी मेंडके ,तहसीलदार केज

__________________________

संततधार पडणाऱ्या पावसाने शालेय जिवनावर परिणाम झाला असुन शाळेतील विद्यार्थी संख्या घटली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी बाबतचा अद्याप कोणताही निर्णय घेतला नसुन मी आज सकाळीच जिल्हाधिकारी आणि वरिष्ठांशी बोललो असुन बाकी जिल्ह्यात जरी शाळांना सुट्या जाहिर केल्या असल्या तरी आपल्या जिल्ह्यात आणखी तसे कोणतेही आदेश आलेले नाहित.

मा. श्री.केंद्रे साहेब ,गट शिक्षणाधिकारी 

__________________________

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!