वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज येथे महामार्ग लगत सुरू असलेल्या हॉटेल उभारणीच्या कामावरील दीड लाख रु. किमतीच्या लोखंडी चॅनेल्सची चोरी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज -कळंब रोडवरील विठाई पुरम भागातील माऊली सिनेमागृहा लगत विष्णुदास पापालालजी लोहिया यांचे हॉटेल उभारणीचे काम सूरु आहे. हे हॉटेल लोखंडी साहित्य आणि चॅनेल्स व अँगल यांचा वापर करून तयार करण्यात येत आहे. दरम्यान दि. २ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने येथील २७ लोखंडी चॅनेल्स चोरून नेले आहेत. ज्याची किंमत १ लाख ५० हजार रु. अशी आहे. या बाबत विष्णुदास पापालालजी लोहिया यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ४५७/२०२२ भा. दं. वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार बाळासाहेब अहंकारे हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!