वादळ वार्ता प्रतिनिधी – शाहेद खतीब
केज तालुक्यातील होळ आणि बनसारोळा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे तर मागील पाच दिवसा पासून पडत असलेल्या संततधार पावासामुळे पिके पिवळी पडण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
केज तालुक्यातील होळ आणि बनसारोळा या दोन महसूल मंडळात ९० मी मी एवढा पाऊस पडल्याने अतिवृष्टी झाली आहे. मागील पाच दिवसां पासून केज तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिकांना पाणी लागल्याने पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. नद्यांना अद्याप पूर आला नसला तरी पाणी पातळीत वाढ होत आहे. दोन दिवसा पासून परिसरात सुर्यदर्शनही झालेले नाही. अद्याप पर्यंत पडझड किंवा नुकसान झाल्याची माहिती नाही
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!