आपला बीड जिल्हाविशेष

काय दिवाळी अणं काय दसरा घनसारवडे कटुंबाने बनवला कोरोनामध्ये मृतदेह जाळण्यासाठी वापरल्या गेलेल्या पत्र्यांचा मसनवट्यात आसरा

घनसारवडे परिवार मदतीची अपेक्षात्मक वाट पाहात आहे .

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

कोरोणाच्या काळात सर्व जग भयभीत झाले होते. भारतातही अशीच परिस्थिती होती. याच काळात असंख्य कुंटुबाच्या कर्त्या-धर्त्या पुरुषाचे छत्र हरवले तर कुणी आईचे प्रेम तर कुणी भाऊ , बहीन वा नातेवाईक. याच काळात कोरोणामुळे मृत्युचे प्रमाण जास्त होते. आणी याच काळात माणुसकी देखील कळाली व नाते देखील कळाले. कुटुंबातील एकादा सदस्य गेला तर मात्र त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी कुटुंबातील एक किंवा दोन माणस दुरुन बघायची.

मात्र त्या मृत्रतेहाचा अंतिम संस्कार करण्यासाठी एकच व्यक्ती केज येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये असायचा तो व्याक्ती म्हणजे घनसारवडे .

घनसारवडे आपल्या कुटुंबासमवेत म्हणजे आपल्या दोन मुली , मुल व पत्नी क्रांतीनगर केज येथील सार्वजानिक स्मशानभूमीत वास्तव्यास होते .

कोविड १९ मध्ये मृतदेह जाळण्याकरिता केज नगरपंचायतच्या वतीने सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये पत्र्याचे कंपाऊड उभा केले होते. त्यामध्येच कोरोना काळातील मृतदेहाला अग्नी दिला जायचा. विशेष त्यांना या कामासाठी केज नगरपंचायतच्या वतीने तुटपुंजे मानधन दिले जायचे .

परंतु घनसारवडे मानधनाचा न विचार करता आपल्या कुटुंबांचा न विचार करता मृतदेहाचा अंतिम संस्कार करत असत . परिवारातील लोक रक्षा सावडण्यासाठी सुद्धा येत नसत त्यावेळी घनसारवडे त्या मृतदेहाची स्वःता रक्षा सावडुन पाण्यामध्ये टाकत असंत.

पाठीमागे वारंवार वादळ वार्ता च्या वतीने घनसारवडे तथा स्मशानभूमीच्या संदर्भांत लेखनीच्या माध्यमातुन आवाज उठवला गेला .कांही सामाजीक संस्था देखील घनसारडे कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढं आल्या होत्या परंतु त्यांना केज नगरपंचायत च्या प्रशासनाने आम्हीच बजेट टाकुन आम्हीच करून घेणार असे आश्वासन दिले गेले परंतु आद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

घनसारवडे कुटुंबाने केज नगर पंचायत प्रशासनाची वाट पाहुन शेवटी कोरोणा कालावधी मध्ये मृतदेह जाळण्याकरिता सार्वजनिक स्मशानभुमीमध्ये वापरण्यात आलेले पत्र्याचे कंपाउंड काढुन आपल्या परिवारासाठी ‘ कुंटुंबासाठी पत्र्याचा निवारा करुण सदरील घनसारवडे परिवार क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे खरे सामाजीक कार्य करत आहे .

तसेच घनसारडे परिवार वाट पाहत आहे केज नगरपंचायत प्रशासनाची वा केज येथील सामाजीक कार्यकर्त्याच्या मदतीची . येईल का कोणी पुढे घनसारवडे परिवारास मदतीचा हात देण्यासाठी ?

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!