वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील कोरेगाव येथून वेल्डिंग वर्कशॉप समोर उभे केलेले ट्रॅक्टर अज्ञात चोरट्यानी चोरून नेले आहे.
या बाबतची माहिती अशी की, कोरेगाव ता. केज येथील अजमेर रसूल तांबोळी यांनी दि. ८ जानेवारी रोजी त्यांच्या मालकीचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे लाल रंगाचे ट्रॅक्टर क्र. (एम एच-२४/ डी-४८६५) हे त्यांच्या कोरेगाव येथील केज-बीड रस्त्या लगतच्या भाई-भाई वेल्डिंग वर्कशॉप समोर उभे केले होते. त्यांनी दि. ९ जानेवारी रोजी सकाळी ६:०० वा. च्या दरम्यान पाहिले असता ट्रॅक्टर आढळून आले नाही. त्यामुळे अजमेर तांबोळी व त्यांचा भाऊ यांनी त्याचा शोध घेतला असता ट्रॅक्टर आढळून आले नाही.
दि. ९ जानेवारी रोजी अजमेर तांबोळी यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ०९/२०२३ भा. दं. वि. ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक दिलीप गित्ते हे त्याचा तपास करीत आहेत.