आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

केवड येथे घरात घुसून हत्याराने हल्ला करण्याचा प्रयत्न !

हत्यारासह एकजण पोलिसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज 

केज तालुक्यातील केवड येथे दोन तरुणांनी एकाच्या घरात घुसून धारदार शस्त्राने मारहाण करून आगळीक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वस्तीतील लोकांनी धाव घेतल्याने पळून जाणाऱ्या एका हल्लेखोरांना मोटार सायकल व धारदार हत्यारासह पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

या बाबतची माहिती अशी की, केवड ता. केज येथील आश्रुबा तुपारे यांचा मुलगा अमर तुपारे याचे मागील काही दिवसां पूर्वी हनुमंत पिंपरी येथील तरुणा सोबत भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून दि.१३ मार्च रोजी ओमकार अरुण मोकाशी आणि त्याचा मित्र हर्षद धमक हे दोघे केवड येथे आले. ते दोघे आश्रुबा तुपारे यांच्या घरात बळजबरीने घुसले. त्यावेळी घरात आश्रुबा तुपारे यांच्या दोन मुली घरात होत्या. त्यांना या दोन तरुणांनी हातातील हत्यार दाखवून धमकावून मुलीस शिवीगाळ केली आणि तूझा भाऊ आमर कुठे आहे ? त्याला दाखव. आम्ही त्याला मारायला आलो आहोत. असे म्हणाले. त्या पैकी हर्षद धमक याच्या हातात लोखंडाचे बनवून घेतलेले गोल आकाराचे धारदार हत्यार होते. दोन्ही मुलींचा ओरडण्याचा आवाज आल्याने अश्रूबा तुपारे हे शेळ्याच्या कोठ्यातून घराकडे पळत आले. तेव्हा त्यांनाही ओमकार आणि हर्षद यांनी शिवीगाळ करून धमकावून तुझा पोरगा कोठे आहे ते सांग ? त्याला आम्ही सोडणार नाही. आम्ही त्याला मारल्या शिवाय राहणार नाही. असे म्हणून शिवीगाळ केली. या भांडणाचा व ओरडण्याचा आवाज ऐकूण वस्तीतील लोक भांडण सोडविण्यासाठी धावून आले. लोकांना पाहताच हल्ला करण्यासाठी आलेले हल्लेखोर त्यांच्या हातातील हत्यार टाकून पळून जात असताना जमावाने एकाला पकडले आणि त्यांच्याकडून हल्ला करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल क्र (एम एच-२०/डी आर-३३४८) यासह धारदार हत्यार ताब्यात घेतले. नंतर केज पोलिसांशी संपर्क करताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक कादरी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे यांनी सरकारी वाहनाने जावून केवड येथून हल्ल्याच्या तयारीत असलेला ओमकार मोकाशी याला ताब्यात घेतले.

दरम्यान आश्रूबा तुपारे यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात ओमकार अरुण मोकाशी आणि हर्षद धमक यांच्या विरुद्ध गु र न १२१/२०२४भा दं वि ४५७, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार बाबासाहेब बांगर हे तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!