वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे
गेवराई तालुक्यातील नरसिंह तांडा येथील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. परंतु, सदर विवाहितेने आत्महत्या नव्हे तर तिचा खुन केल्याबाबतची तक्रारी माहेरच्या मंडळींनी केली होती. यावरून मृत महिलेच्या पतीसह सासरा, सासु, दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील नरसिंह तांड्यातील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावरून अंजली राठोड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र सदरचा प्रकार हा आत्महत्या नसुन सासरच्या लोकांनी केलेला खुन आहे. असा आरोप मयत विवाहित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता.
रास्ता रोकोनंतर गुन्हा दाखल
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; यासाठी मयत मुलीच्या नातेवाईकांनी गेवराई शेवगाव महामार्ग अडवत रस्ता रोको केला होता. या प्रकरणी आता मयत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा, दिर यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!