आपला बीड जिल्हा

अफवावंर विश्वास ठेवू नका;अफवा पसरविणारऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार – सपोनि शंकर वाघमोडे

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

मुलांना पळविणारी टोळी शहरात आली असल्याच्या खोट्या अफवा सोशल मिडियाद्वारे पसरवून भीतीचे वातावरण पसरविले जात आहे.

अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि अफवा परविणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दिली आहे.

केज पोलीसांच्या वतीने प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी आवाहन केले आहे की, काहीजण खोडसाळपणे आणि कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करण्याच्या जाणीवपूर्वक हेतूने किंवा काहीजण गैरसमजुतीपोटी जिल्ह्यात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्या असल्याच्या खोट्या अफवा सोशल मिडीयाच्या माद्यमातून पसरवीत आहेत. मात्र असा प्रकार खरा नाही. या सर्व अफवा आहेत. तेव्हा नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये आणि अशा खोट्या अफवा पसरवू नयेत जर कोणी अशा अफवा पसरवत असेल तर प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेऊन त्याच्यावर कठोरे कारवाई करणार असल्याचे ताकीद त्यांनी दिली आहे. तसेच त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे की,

अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये.

लहान मुलांना पळून नेण्याची घटना केज तालुक्यात अथवा बीड जिल्ह्यात जिल्ह्यात कोठेही घडलेली नाही.

लहान मुलांना पळविणारी कोणतीही टोळी जिल्ह्यातील खात्रिशीर माहिती नुसार जिल्ह्यात नाही.

केज शहरात व तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची दिवस रात्र सतत २४ तास मोटरसायकल व जीप गस्त सुरू आहे.

संशयित व्यक्ती समजून शहानिशा न करता किंवा पोलिसांना न कळविणे आणि त्यांना मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे.

अनोळखी व्यक्तींना कोणीही मारहाण करू नये. किंवा फूस देऊ नये; अन्यथा त्या विरोधात कारवाई करण्यात येईल

केज शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक, पालक तसेच सर्व शाळा व कॉलेज यांचे मुख्याध्यापक यांना कळविण्यात येते की, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये.

कोणत्याही व्यक्तींचा संशय आल्यास ०२४४५-२९५१०० आणि ११२ क्रमांक डायल करावा तसेच ८८०१६४६४६४

यावर तात्काळ संपर्क साधावा असेही आवाहन केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!