श्री संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय जायकवाडी वसाहत बागपिंपळगाव या शाळेत गुरूवार दि.11 रोजी रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बापुराव घुले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भागवत सोळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाचवी ते दहावी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनीने विद्यार्थ्यांना राख्या बांधुन हा सण साजरा केला. तसेच मुलांनी राखी बांधून मुलींना शैक्षणिक साहित्य भेट दिली. मुलांनी मी नेहमी आपल्या बहीणीचे रक्षण करेल आशी शपत घेवून या सणाचे महत्व सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षिकेने शिक्षकांना राखी बांधून हा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाचे सुञसंचलन मयुर येवलेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजली माने, नवनाथ घुगे, हरिभाऊ आघाव, वर्षा कांडेकर, योगेश म्हैसनवाड, प्रसाद कुलकर्णी, शिवाजी पवार, गोरख साकळे, बाबासाहेब कांबळे, ज्ञानेश्वर बास्टे भागवत आदींनी परिश्रम घेतले .
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!