आपला बीड जिल्हाआपले केजसामाजीक

धरण उशाला कोरड घशाला अन पाणीपट्टीची कात्री खिशाला

वादळवार्ता – केज

नगरपालिका, नगरपंचायत अधिनियम १९६५ प्रमाणे सत्ताधारी , प्रशासनाने नागरीकांना प्राथमिक सुविधा देणे बंधनकारक असताना मात्र केज शहरात पिण्याच्या पाण्याची भयंकर अवस्था समोर येत आहे.

याबाबत माहिती अशी की केज शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धनेगावच्या धरणामध्ये भरपुर प्रमाणात पाणी साठा असुन देखील केज नगरपंचायतीच्या नियोजन शुन्य कामामुळे शहरातील नागरीकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. एकुन १७ वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन बोअरवेल असताना आरध्यावर बंद पडल्या आहेत तर कांही नादुरूस्त आहेत तर काहींचे पाणी कमी झाले असल्यामुळे जे पाणी मिळत आहे त्यासाठी भंयकर गर्दी दिसत आहे. शुक्रवार पेठ येथील बोअरवेलला नागरीकांनी केलेली गर्दी आणी त्यांचे पाण्यासाठी होतं असणारे हाल यावरुन हेच दिसुन येते कि ” परिवर्तन ” झाले.

एकतर धनेगावचा पाणीपुरवठा तब्बल २० दिवसांनी होतो तोहि अस्वच्छ आणी दुसरीकडे मात्र सक्तीने पाणी पट्टी वसुल केली जाते यामुळे केज शहरातील नागरीकांची अशी अवस्था झाली आहे कि “धरण उशाला अन कोरड घशाला पाणीपट्टीची कात्री खिशाला “

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!