आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

चुलत सासऱ्याने केला २९ वर्षाच्या पाच मुलांची आई असलेल्या सुनेचा विनयभंग

पीडित महिलेच्या पतीस कुऱ्हाडीने मारहाण

  • वादळवार्ता – गौतम बचुटे

केज तालुक्यात एका पाच मुलांची आई असलेल्या २९ वर्षाच्या विवाहित सुनेचा तिच्या चुलत सासऱ्याने विनयभंग केला असून तिच्या नवऱ्याला देखील कुऱ्हाडीने मारहाण करून हाताला चावा घेतल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादी वरून नराधम सासरा आणि त्याची दोन मुले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २ एप्रिल रोजी केज तालुक्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दुपारी ३:०० च्या सुमारास चार मुली व एक मुलगा अशा पाच मुलांची आई असलेली विवाहिता ही शेतात खुरपणी करीत होती. त्यावेळी तिचा चुलत सासरा हा तिथे आला आणि तुमच्या शेतातील नांगरणी केलेली माती माझ्या शेतात कशी काय आली ? असे कारण काढून त्याने चुलत सुनेला मारहाण केली. तसेच तिला खाली पाडून वाईट हेतूने तिचा विनयभंग केला. तिची आरडा ओरड ऐकून तिचा नवरा व सासू पळत आले. तेव्हा त्या नराधमाने तिच्या नवऱ्याच्या खांद्यावर कुऱ्हाड मारून जखमी केले. तसेच त्याच्या एका मुलाने हाताला चावा घेतला तसेच दुसऱ्या मुलाने मारहाण करून त्या सर्वांना कुऱ्हाडीने तोडून जीवे जीवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी पीडित विवाहितेचा फिर्यादी वरून नराधम चुलत सासरा आणि आणि दोघे चुलत दीर यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. २ एप्रिल रोजी गु. र. नं. १९७/२०२३ भा. दं. वि. ३५४, ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!