आपला बीड जिल्हा

आ.नमिताताई मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिले केजमधील उमरी रस्त्याचे पत्र  

वादळवार्ताने 3 मार्च पासुन दाबुन ठेवलेल्या पत्रावरील मंजुर निधीची प्रकाशीत केली बातमी ; त्यानंतर हालचालीला आला वेग.

वादळवार्ता वार्तांकन – अजय भांगे

केज शहरातील उमरी रस्त्याच्या मंजूर झालेल्या 98 लक्ष रुपयाच्या निधीच्या बातम्या वादळ वार्ता च्या माध्यमातुम प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतर केज संघर्ष समितीचे तथा सामाजीक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांच्या सह पदाधिकारी यांनी केजच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा तसेच केज नगरपंचायतचे मुख्याधिकारी, केज तहसिलचे तहसिलदार यांना निवेदन सादर केले होते. सदरील निवेदनावर उमरी रस्त्यासाठी सुरुवातीपासून संघर्ष करणाऱ्या केज संघर्ष समितीला 98 लक्ष रुपायांचा निधी आलेला का कळवला नाही ? असे मुख्याधिकारी यांना निवेदनाव्दारे विचारले होते, सदरील रस्त्याची कामे तात्काळ सुरु करावीत अन्यथा 1 तारखेला घंटानाद अंदोलन करण्याचा ईशाराही दिला आहे. याची अधिकार्‍यानी कोणतीच दखल घेतली नाही.

परंतु केज विधानसभेच्या आमदार सौ. नमिताताई मुंदाडा यांनी उमरी रस्त्याची दखल घेऊन थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे त्यामध्ये उमरी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सन 2021- 2022 या आर्थिक वर्षात प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे नागरीकांसाठी अत्यंत महत्वाचा असेलेल्या उमरी रस्त्याच्या दुरुस्तीची प्रशासकीय मंजुरी कायम ठेवुन तातडीने काम करणे अत्यंत आवश्यक आहे असे मुंख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

यामुळे केज शहारातील उमरी रस्त्यासाठी कर्तव्यदक्षपणे केलेल्या पाठपुराव्यामुळे केज विधानसभेच्या आमदार नमिताताई मुंदडा यांच्या नावाची चर्चा केज शहरामध्ये होत आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!