वादळवार्ता वार्तांकन – केज
आज दिनांक :- १२ जानेवारी २०२३ रोजी हिंदवी स्वराज्याच्या जननी माॅंसाहेब जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त स्वाराती उपजिल्हा रुग्णालय अंबाजोगाई येथील ब्लड बँकेत सध्या जो तुटवडा निर्माण झाला आहे त्याकरिता ढाकेफळच्या युवकांनी सामाजिक बांधिलकी जपण्याच्या भावनेतून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीराच्या सुरुवातीस राजमाता राष्ट्रमाता माॅंसाहेब जिजाऊंच्या व युवकांचे प्रेरणास्थान असणारे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करुन रक्तदान शिबीरास सुरुवात करण्यात आली.या रक्तदान शिबीरास अॅड.लक्ष्मिकांत थोरात,रमेश भैय्या थोरात, बबन भाऊ थोरात,फुलचंद बप्पा थोरात ,रघुनाथ थोरात,विलास थोरात, प्रविण थोरात यांच्या मार्गदर्शना खाली व सरपंच रतन मामा अंधारे,उपसरपंच गोपाळ थोरात, चेअरमन राजपाल थोरात,शालेय समिती उपाध्यक्ष हनुमंत चटप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अरविंद थोरात, बालासाहेब थोरात,प्रकाश घाडगे,शुभम अंधारे,महादेव थोरात,संतोष थोरात,कृष्णा काटकर,लक्ष्मण थोरात,दादा थोरात,दिपक थोरात यांच्या नियोजनातुन आयोजन केले होते.
यावेळी रक्तदान शिबिरात रमेश भैय्या थोरात,अॅड.लक्ष्मीकांत थोरात,रघुनाथ थोरात,गणेश थोरात,सखाराम थोरात,घाडगे प्रकाश,थोरात प्रतीक,भैरवनाथ थोरात, प्रवीण थोरात,राजपाल थोरात,श्रीनिवास थोरात,प्रतुल थोरात,दिपक थोरात,अभिषेक चटप,अंगद थोरात,तुकाराम थोरात, ऋषिकेश थोरात,थोरात गणेश,संतोष थोरात,शुभम अंधारे,रामानंद थोरात,गोपाळ थोरात, अरविंद थोरात,थोरात लक्ष्मण तसेच प्रशंसनीय बाब म्हणजे जिजाऊंच्या वारसदार २ महिला मंदा अंधारे,प्रिती अंधारे यांच्या सह बहुसंख्येने रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करुन माॅंसाहेब जिजाऊंना दिली मानवंदना.या रक्तदान शिबीरास शषीकांत पारेख सर,कादरी सर व त्यांच्या टिमने सहकार्य केले.