वादळवार्ता – धारूर
किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात सराफा व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना किल्लेधारूर येथील तेलगाव रोड येथील विजय बिअर बार येथे रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.पुढील प्रकिया सुरू होती.किल्लेधारूर येथील तेलगाव रोड लगत विजय बियर बार आहे त्याच्या सुमोर धारूर येथील नितीन मोहन धोत्रे वय ४० वर्षे व इतर काही जणांमध्ये रविवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास भांडण झाले होते.या भांडणांमध्ये नितीन धोत्रे या सराफा व्यापाऱ्याचा जागीच खून झाल्याची घटना घडली आहे.
भर रस्त्यावर झालेल्या या खुणाच्या घटनेमुळे धारूर शहरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पहाणी केली.नितीन धोत्रे यांचे धारूर शहरात सराफा दुकान आहे.या प्रकरणांमध्ये नातेवाईकांनी पोलीसात धाव घेवून आरोपीस अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रकिया उशिरापर्यंत सुरू होती . खुणाबद्दल मात्र नेमके कारण समजू शकले नाही पोलीस स्टेशन मध्ये राञी उशीरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू होती.सहायक पोलीस निरीक्षक व्हि.एस.अटोळै यांना चौकशी केली असता या प्रकरणी एक जन ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रीया सुरू असल्याचे सांगीतले.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!