आपला बीड जिल्हा

केज येथे माजी सैनिकांचा मेळावा संपन्न

केज पंचायत समितीच्या सभागृहात संघर्ष माजी सैनिक संघटना केज आयोजित सैनिक मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न…..

वादळवार्ता वार्तांकन – शाहेद खतीब

सविस्तर वृत्त असे कि स्वातंत्र्याच्या अमृत्त महोत्सवा निमित्त संघर्ष माजी सैनिक संघटना केज च्या वतीने सैनिक मेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रमाचे अयोजन ऐन स्वातंत्र्या दिनी १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले परंतु आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनामुळे हा कार्यक्रम रद्द करून आज १६ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते . हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पंचायत समीतीच्या सभागृहामध्ये पार पडला . या कार्यमाचे आयोजन संघर्ष माजी सैनिक संघटना केजचे अध्यक्ष शेख अजीमोद्दीन, उपाध्यक्ष राम राऊत , सचिव हनुमंत भोसले सर , सहसचिव राजेद्रं बारगजे, कोषाध्यक्ष सदाशिव मस्के ,संचालक नामदेव केदार , संचालक विक्रम घुले , संचालक नवनाथ गायकवाड आदि माजी सैनिकांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!