वादळवार्ता – केज
सविस्तर वृत्त असे कि केज तालुक्यातील प्रसिद्ध असे KPL क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केज पंचायत समीतीच्या मैदानावर दुपारी ०१ वाजता संपन्न झाले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन केज तालुक्याचे नेते बजरंग बप्पा सोनवणे हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन केज पोलिस ठाण्याचे सपोनि शंकर वाघमोडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन दत्तात्रय ठोंबरे ,नवाब मामु , मुस्तफा खुरेशी , भाऊसाहेब गुंड , पप्पु इनामदार , गोसमोद्दिन इनामदार, सय्यद शरीफ हे होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळाडूंचा परिचय घेऊन अध्यक्षांच्या वतीने नाणेफेक करण्यात आले त्यानंतर मैदानावर श्रीफळ कोडुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर बजरंग बप्पा सोनवणे यांनी ” खेळाच्या माध्यमातून सामाजीक बांधिलकी जोपासली जाते त्याबरोबरच खेळामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढतो ” असे मनोगत व्यक्त केले . सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन KPL स्पर्धेचे आयोजक तथा बजरंग बप्पा सोनवणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शद्दो खतीब यांनी केले तर आभार ताज इनामदार यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी करिम बॉस , राजु इनामदार , सय्यद फयुम , अस्लम खुरेशी , निजाम इनामदार , शेख आदिल आदिनी परिश्रम घेतले.

उद्घाटन कार्यक्रमास केज तालुक्यातील तथा शहरातील मोठ्या संख्येने किक्रेटप्रेमी उपस्थित होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!