वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज :- आठवड्यात तालुक्यातील विविध गावातून तीन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुली बेपत्ता झाल्या आहेत.
या बाबतची माहिती अशी की, या आठवड्यात केज तालुक्यातील केज पोलीस ठाणे हद्दीतील दहिफळ वडमाऊली, जिवाचीवाडी, मस्साजोग आणि युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कौडगाव या विविध गावातून तीन महिला, एक पुरुष व दोन अल्पवयीन मुली असे एकूण सहाजण वेगवेगळ्या ठिकाणाहून बेपत्ता झाले आहेत.
केज पोलिस ठाणे हद्दीतील दहिफळ वडमाऊली येथून सुप्रिया अमोल कांबळे वय (२५ वर्ष) आणि तिच्या दोन मुली कु. समिक्षा अमोल कांबळे वय (८ वर्ष) व कु रिंकू अमोल कांबळे वय (३ वर्ष) या बेपत्ता झाल्या आहेत. जिवाचीवाडी येथून अर्चना शिवाजी चौरे वय (२२ वर्ष) ही बेपत्ता आहे. तर ठाणे मस्साजोग येथून योगेशकुमार गोरोबा देशमुख वय (३४ वर्ष) आणि युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कौडगाव येथून अश्विनी इंद्रजित चाटे वय (२९ वर्ष) ही बेपत्ता झाली आहे.
या सर्वांच्या बेपत्ता असल्याची नोंदी केज आणि युसुफवडगाव येथे संबंधित पोलीस ठाण्यात झाल्या असून केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. कोणाला या बाबत काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
( टीप :- अर्चना शिवाजी चौरे हिचा फोटो उपलब्ध नाही )
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!