वादळवार्ता प्रतिनिधी – महादेव काळे
वीज वितरण कंपनीच्या भ्रष्ट कारभारा विरुद्ध रिपाइं (ए) च्या वतीने केज येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, दि. १ जुलै रोजी केज तालुका रिपाइंच्या (ए) वतीने उपविभागीय वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन त्यात त्यांनी मागील चार वर्षां पूर्वी केज तालुक्यात केलेल्या विविध कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
परंतु त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सल्लागार उत्तम मस्के व जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड यांच्या उपस्थितीत उपविभागीय वीज वितरण कार्यालया समोर; एच ओ डी एस योजने अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, डीपी नादुरुस्त झाल्यास शेकऱ्यांकडून अधिकारी बेकायदेशीरपणे पैसे घेतात आणि गुत्तेदारांच्या संगनमताने लाखो रु. ची बिले काढतात; त्या भष्टाचाराची चौकशी करा , केज येथे डीपी दुरुस्ती केंद्र सुरू करा , उपविभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी , अनुसूचित जाती जमातींना त्यांच्या योजना पासून वंचित ठेवून त्यांचा लाभ गैरलाभार्थ्यांना देणे, वीज वितरण प्रणाली सक्षम करून बिघडांची दुरुस्ती करणे , काही अधिकारी हे त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर लोकांना त्यांचे आयडी पासवर्ड दिल्याने गोपनीय माहिती बाहेर जाणे, उपकार्यकरी अभियंता अंबेकर हे मुख्यालयी राहत नसल्याची चौकशी करणे तसेच एक गाव एक दिवस योजना, एन एस सी योजना, ए जी पॉलीसी योजना यासह उपकार्यकारी अभियंता अंबेकर यांच्या निलंबनाच्या मागण्यासाठी प्रचंड घोषण देत आणि मागण्यांचे फलक घेऊन तीव्र निदर्शने केली.
या आंदोलनात तालुका अध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सल्लागार उत्तम मस्के, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड यांच्यासह ईश्वर सोनवणे, शहराध्यक्ष भास्कर मस्के, तालुका सचिव गौतम बचुटे, राहुल सरवदे, उपाध्यक्ष बाळासाहेब ओव्हाळ, विकास आरकडे, कैलास जावळे, दिलीप बनसोडे, रोहित कांबळे, रवी गायसमुद्रे, भागवत हजारे, रमेश जानराव, विनोद शिंदे, रणजित बचुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या आंदोलना प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, पोलीस जमादार रमेश सानप, चौधरी आणि निरडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला. यावेळी उपअभियंता मुंडे आणि निंगुळे यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.