आपले केजनिवडणुक

केज तालुक्यात८४.१३% मतदान !

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

 केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. यात ८४.१३ % मतदान झाले. निवडणुकीत मतदारानी रांगा लावून मतदान केले. यावेळी वृद्ध, दिव्यांग व्यक्तींनी मतदान केले.

केज तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतिच्या सरपंच व सदस्यासाठी आज दि. १८ डिसेंबर रोजी मतदान झाले. या पैकी धर्माळा आणि आनेगाव या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तसेच ११ ग्रामपंचायती या अंशतः काही जागेसाठी बिनविरोध झाल्या आहेत. त्यात केकत सारणी, पिसेगाव, कुंबेफळ, राजेगाव, सारुळ, जोला, माळेवाडी, सादोळा, औरंगपूर, शेलगाव-गांजी आणि हादगाव (डोका) ही गावे आहेत. एकूण चार सरपंचाच्या निवडी बिनविरोध झाल्या तर ३७ सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ६४ ग्रामपंचायतीच्या ६२ सरपंच आणि सदस्यांच्या निवडणुकीसाठी २०८ प्रभागाची निवडणूका झाल्या. त्यासाठी सरपंच पदासाठी एकूण १७३ उमेदवार रिंगणात होते. तर सदस्य पदासाठी ११८४ उमेदवार आपले भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

दरम्यान या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १ लाख १ हजार ५४८ मतदारां पैकी ८५ हजार ४३० मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. त्या मध्ये ३९ हजार ५७० स्त्री मतदार आणि ४५ हजार ८६० पुरुष मतदारांचा समावेश आहे. ६४ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत बावची येथे ९२.५३% मतदान झाले बावची येथील ५४९ मतदार पैकी ५०६ मतदारांनी आपला हक्क बजावला तर त्या तुलनेत सारणी (सांगवी) येथे सर्वात म्हणजे ७२.६० % मतदान झाले. सांगवी येथील १२१९ मतदारां पैकी ८८५ मतदारांनी हक्क बजावला.

दरम्यान चिंचोली माळी आणि साळेगांव येथील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपून गेल्या नंतरही सायंकाळी ७:३० वा पर्यंत मतदान सुरू होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!