आपला बीड जिल्हाराजकीय

अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस सामाजीक न्याय विभाग तालुका कार्यकारिणी जाहिर…

तालुका अध्यक्षपदी महेश जोगदंड तर शहर अध्यक्षपदी योगेश माने

वादळवार्ताअंबाजोगाई

दि. १२ माजी आमदार संजय भाऊ दौंड यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग बीड जिल्हा अध्यक्ष पदी मा.पंकज हजारे हे पक्ष संघटनेच्या नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी आले असता त्यांचा माजी आमदार संजय भाऊ दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे , माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी , माजी उपनगराध्यक्ष बबन भैय्या लोमटे, उज्जैन बनसोडे व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष पंकज हजारे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभाग बीड जिल्हा उपाध्यक्ष पदी महेश वेडे, जिल्हा संघटक पदी प्रताप साळवे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष पदी महेश ( गुड्डू ) जोगदंड, अंबाजोगाई शहर अध्यक्ष पदी योगेश माने, शहर कार्याध्यक्ष पदी आकाश चंद्रकांत बनसोडे, तालुका उपाध्यक्ष पदी केशव ( मारी ) जोगदंड व अंबाजोगाई तालुका संघटक पदी अमित कोकाटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच या वेळी उमराई येथील आकाश कसबे व सूरज वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी रामेश्वर जाधव, स्वप्नील हतागळे, भूषण कांबळे, आशिष गोडबोले, आदित्य गोदाम, सूरज वाघमारे, निखिल वागळे, आकाश कसबे, सूरज वाघमारे, राजेश शिंदे, धनराज केंद्रे, अमर वाघमारे, आदित्य वाघमारे, दीपक राऊत, राहुल ढवारे, किशोर सूर्यवंशी, प्रसाद चाटे, अक्षय गोडबोले, वसीम पिंजारी, यशवंत मस्के, करण कुऱ्हाडे, धीरज सरवदे, करण भालेराव व इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते तसेच आज नवनियुक्त शहर कार्याध्यक्ष आकाश बनसोडे चा वाढदिवस असल्यामुळे त्यास सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!