वादळवार्ता – गौतम बचुटे
केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प पहाण्यासाठी आलेल्या दोघांनी तेथे प्रकल्पाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मांडीचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी दोघा विरुद्ध शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची अशी की दि.३ एप्रिल रोजी युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार वैजनाथ कुंडलीकराव वनवे व साठे हे दोघे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर बंदोबस्तावर तैनात असताना सायंकाळी ५:१५ वा.इस्थळ येथील जुबेर रशीद शेख व त्याचे सोबत रिहान पठाण हे दोघे पोलीसा जवळ आले. ते त्यांना म्हणाले की, आम्हाला डॅम पाहायचा आहे. आत मध्ये जावु द्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की, हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र असल्यामुळे व सुरक्षीततेच्या दृष्टीने आत मध्ये जाता येणार नाही. असे म्हणताच आम्हाला का जावु देत नाहीस ? तुला आम्ही ओळखतो. असे म्हणुन वणवे यांना त्या दोघांनी धक्का-बुक्की केली. आत जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलीस हवालदार वणवे यांना ढकलुन देवुन खाली पाडले. जुबेर रशीद शेख व त्याचे सोबत रिहान पठाण यव दोघांनी वणवे यांच्या उजव्या पायाचे गुडघ्यावर व गुडघ्याचेवर लाथा मारल्या. त्या नंतर ते दोघे तेथुन निघुन गेले. वणवे यांनी पोलीस कर्मचारी बाळासाहेब घोरपडे यांना फोन करून या घटनेची माहीती दिली त्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे साहेब, खेडकर, बाळासाहेब घोरपडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी पोलीस कर्मचारी वणवे यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविले.
दरम्यान दि. ५ एप्रिल रोजी वैजनाथ वणवे यांच्या फिर्यादी वरून जुबेर रशीद शेख आणि रिहान पठाण यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गु र नं ६६/२०२३ भा दं वि ३३३, ३५३ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार सिरसाट हे पुढील तपास करीत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!