शाळा दुरुस्त करण्याच्या नावाखाली जुने पत्रे गायब : शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची तक्रार
वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीचे काम केल्या नंतर गुत्तेदाराने जुने साहित्य लंपास केले असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगांव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव गांजी येथील शाळेच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती डी पी डी सी अंतर्गत करण्यात आली शाळेची दुरुस्ती करीत असताना संबंधित सुरुस्ती करीत असलेल्या गुत्तेदाराने शाळेतील जुने पत्रे घेऊन गेला आहे.
या बाबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव जाधव आणि सुनील जाधव, अशोक जाधव व विठ्ठल पटणे यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी शाळेचे जुने पत्रे आणि इतर साहित्य हे शाळेत नसल्याची तक्रार दाखल केली. त्या नंतर गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने केंद्र प्रमुख यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी शाळेला भेट दिली. तक्रारी निवेदनाची चौकशी करून १७ ऑगस्ट रोजी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर केला.
त्या अहवालात शाळेच्या दोन वर्ग खोल्या दुरुस्त केल्या आहेत. वर्गावरील पत्रे, खिडक्या, दरवाजे व फरशी दुरुस्त केली असून शाळेत ४ जुने पत्रे आहेत. तसेच जुने लोखंडी अँगल वापरात आणलेले आहे. अशी माहिती मुख्याद्यापक यांनी केंद्र प्रमुखाला दिली. परंतु जुने साहित्य हे दुरुस्तीचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने शाळेत ठेवले नाही. असे पत्र दिले आहे.
या अहवाला वरून गटशिक्षणाधिकारी यांनी दि. ३० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी यांना सादर केलेल्या अभिप्रायामध्ये शाळा दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने जुने पत्रे शाळेत ठेवले नसल्याचा उल्लेख केला आहे.
दरम्यान या प्रकरणी आता गटविकास अधिकारी काय कारवाई करतात; हे काही दिवसात समजेल.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!