केज वादळ वार्ता प्रतिनिधी —
केज शहरामधील “रामकृष्ण बाल विद्या मंदिर” यांच्या वतीने वारकरी सांप्रदायातील सर्वात मोठा उत्सव देवशयनी आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीत बाल विद्यार्थी वारकऱ्यांच्या विविध वेशभूषेत सहभागी झाले होते.यावेळी काही विद्यार्थी विठ्ठल रखुमाई,विविध संतांच्या वेशभूषेत तर काहीजण पालखी,टाळ,मृदंग,डोईवर तुळशी वृंदावन घेवून सहभागी झाले होते.दिंडी धारूर रोड येथील विठ्ठल मंदिरात पोहचल्यास बाल वारकऱ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मुर्तीनां हार घालून दर्शन घेण्यात आले.
तसेच यावेळी बाल वारकऱ्यांनी वेगवेगळया संताचें अभंग म्हणत भजन करण्याचा तसेच फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.बाल गोपाळांनी काढलेल्या दिंडीचा आनंद घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा पालक व विठ्ठल भक्तांनीं गर्दी केली होती.बाल गोपाळांच्या दिंडीने व त्यांनी केलेल्या वेशभूषेने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते.दिंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण बाल विद्या मंदिराच्या संचालिका खंदारे मॅडम,सहकारी ठोंबरे मॅडम,देशमुख मॅडम,पालक व इतर सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.