आंदोलनआपले केज

केज येथे स्वातंत्र्यदिनी रिपाईचे विविध मागण्या संदर्भाने उपोषण ; अधिकार्‍यांच्या लेखी अश्वासनानंतर मागे 

वादळवार्ता – केज 

केज तालुक्यातील विविध मागण्याच्या संदर्भाने रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे केज तालुकाध्यक्ष सुनील हिरवे तथा मराठा आघाडीचे तालुकाध्यक्ष नवनाथ तपसे तसेच कोठी येथील ग्रामस्थांच्या वतीने केज तहसिल कार्यालया समोर ऐन स्वातंत्र्य दिनी आमरण उपोषण करण्यात आले होते. उपोषणातील प्रमुख मागण्या या होत्या कि ग्रामपंचायत कोठी ता. केज जि. बीड येथील रोजगार हमी योजने अंतर्गत शहाजी अश्रुबा शिनगारे यांची विहीर चोरीस गेली तिचा शोध करणे. तसेच रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या जलसिंचन विहिरीची कामे मशीनद्वारे जेसीबीने केलेल्या कामाची चौकशी करून हजेरी पत्रकाप्रमाणे संबंधित रोजगार मुजराकडून बोगस उचललेल्या रकमेची वसुली करावी. व ग्रामपंचायत कोठीचे भ्रष्ट ग्रामसेवक यांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी. तसेच कोठी येथील बोगस कबाल्याच्या प्रती संबंधित ग्रामसेवक इंगळे यांच्या ताब्यात असलेल्या कबाल्याच्या साक्षांकित प्रती देण्यात याव्यात. या बरोबर कोठी येथील गावठाणातील अतिक्रमित झालेले रस्ते, जमीन व घराचे अतिक्रमण काढण्यात यावे.तथा कोठी येथील रोजगार सेवकास तात्काळ काढून टाकण्यात यावे. आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत विहिरीच्या भ्रष्टाचाराची अँटी करप्शन ब्युरोमार्फत चौकशी करावी व इंजिनियर अमोल डाके यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. आदि मागण्या घेऊन यासंदर्भात सुनील हिरवे केज तालुका अध्यक्ष रिपाई यांच्या अर्जानुसार नवनाथ तपसे केज तालुका अध्यक्ष मराठा आघाडी रिपाई व कोठी येथील ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी उपोषण आरंभ करून त्याचा यशस्वी समारोप झाला. कोठी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याच्या दिशेने मा. तहसीलदार व मा. गटविकास अधिकारी यांनी लेखी आदेशित केले आहे.

उपोषणार्थींचे उपोषण मा.संदिपान तात्या हजारे- बीड जिल्हा कार्याध्यक्ष रिपाई, महेंद्र निकाळजे – नेते रिपाई, महसूल अधिकारी, अशोक गंडले यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले. प्रसंगी अंकुश किशनराव नवले, हिरामणजी काळे, अमित डोंगरे, कुलदीप डोंगरे, जालिंदर शिंदे, अंगद शिनगारे, विनोद शिंगारे, संविधान गायकवाड, रोहित शिंगारे, संग्राम शिंगारे, सिद्धेश्वर शिंगारे, तात्याराम भैरट, नवनाथ तपसे, अमोल मस्के, हनुमंत झेंडे, सचिन ठोकळ इत्यादी प्रमुख उपस्थित होते.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!