आपला बीड जिल्हाआपले केजक्राईम

शेतातून जाऊ नको म्हणून डोक्यात घातली काठी अन पोटाला घेतला चावा

वादळवार्ता वार्तांकन – केज

पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या एकाला आमच्या शेतातून तू जाऊ नको म्हणून तिघांनी संगनमत करून काठीने मारहाण करून पोटाला चावा घेतल्याची घटना घडली आहे.

या बाबतची माहिती अशी की, सतीष मोहन जोगदंड हे दि ३१ डिसेंबर रोजी त्यांच्या गट नं. /सर्वे नं. १८९ मधील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असताना प्रताप अभिमान जोगदंड, बाळासाहेब दगडु बसवर आणि प्रशांत अभिमान जोगदंड यांनी दारू पिऊन सतीष मोहन जोगदंड याला तु आमच्या शेतातून जाऊ नको असे म्हणून तिघांनी संगनमत करून त्याच्याशी भांडण केले. तसेच काठीने मारहाण केली आणि बाळासाहेब बसवर हा सतीश जोगदंड याच्या पोटाला चावला.

या प्रकरणी दि. १ जानेवारी रोजी सतीश जोगदंड याच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात प्रताप अभिमान जोगदंड, बाळासाहेब दगडु बसवर आणि प्रशांत अभिमान जोगदंड या तिघांच्या विरुद्ध गु र नं ०१/२०२३ भा. दं. वि. ३२४,३२३, ५०४, ५०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!