आपला बीड जिल्हा

गंगावाडी जि.प.प्रा.शाळेतील मुला – मुलींना चिखल पाण्यातुन करावी लागते पायपीट

विद्यार्थ्यांना चिखलातून करावा लागतो प्रवास

वादळवार्ता वार्तांकन – गेवराई

गेवराई तालुक्यातील तलवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण केंद्रा अंतर्गत गंगावाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येत असून हि शाळा पहिले ते आठवी वर्गा पर्यंत आहे.

या शाळेत मुल – मुली असे एकूण 200 जवळपास पट संख्या आहे. हि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावापासून 500 मीटर अंतरावर श्री. पंचलिंगेश्वर संस्थान मंदिर परिसरात गोदावरी नदीच्या हाकेच्या अंतरावर असून या शाळेत मुला – मुलींना जाण्यासाठी अक्षरश: चिखल मातीचा रस्ता आहे. हा रस्ता पावसाळ्यात गाळयुक्त होत असल्याने या रस्त्यावरून मुक्या गुरा ढोरांना देखील चालणे अवघड होत आहे. मात्र शाळेतील हि 200 चिमुकली मुल – मुली कसे प्रवास करत असतील हा चर्चेचा विषय बनला आहे.

या रस्त्यांचे कोणालाच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. या शाळेतील विद्यार्थींना कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न पडला आहे.

गांवातील पांढरपेशी गांव पुढारी, ग्रामपंचायत म्हणजे असुन अडचण नसून खोळंबा अशा अवस्थेत आहे. सततच्या पावसाने रस्ता अगदी बेचिराख झाला आहे. तरी सुद्धा याकडे कुणीच लक्ष देईला तयार नाही. गांवतील सरपंच, गांव पुढारी फक्त नावलाच उरले आहेत की काय ? असे विद्यार्थी व पालकवर्गातुन बोलले जात आहे. या रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे काही पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास नकार देत आहेत.

तर काही पालक या शाळेतील दाखला काढून बाहेर गांवातील शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा रस्ता ग्रामपंचायताने, संबंधित विभागाने लवकरात लवकर करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!