आपला बीड जिल्हाआपले केज

मांजरा नदी पुलाजवळच्या रस्त्याचे काम तात्काळ करा…आम आदमी पार्टी

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज: केज-कळंब महामार्गावरील मांजरा नदीच्या पुलाजवळील एक किमी चा नादुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त करा तसेच केज शहरातील धारूर रोड व कळंब रोड या भागातील महामार्गावरील पथदिवे मेगा कंपनीने तात्काळ सुरू करावेत या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी केज च्या वतीने तहसीदार यांना देण्यात आले.

सध्या खामगाव-पंढरपूर या मार्गाचे काम मेगा कंपनी करत आहे. या कंपनीने कळंब शहराजवळ केज तालुका हद्दीत मांजरा नदीच्या पुलाजवळील एक किमी चा रस्ता अपूर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे व दगडामुळे कोणतेही वाहन चालवणे अत्यंत अवघड व धोकेदायक अवस्थेत आहे.

या रस्त्यावरून कोणतेही वाहन चालवताना पाठदुखी, श्वसन व विकारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. यासाठी मुख्य पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत कंपनीने या एक किमी रस्त्याचे कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करावा, केज शहरातील धारूर रोड व कळंब रोडवर बसवलेले पथदिवे तात्काळ सुरू करावेत आणि शहरातील कळंब रोडवर महामार्गालगत दोन्ही बाजूनी नाली बांधकाम त्वरित करावे या मागणी चे निवेदन केज तहसीलदार यांना केज तालुका आम आदमी पार्टी च्या वतीने तालुकाध्यक्ष नासेर मुंडे व पक्ष समन्वयक हनुमंत भोसले यांनी दिले आहे.

दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास येत्या 23 जानेवारी 2023 रोजी दुपारी एक वाजता या महामार्गावर मांजरा नदी पुलावर बेमुदत रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!