Uncategorized
वाळू तस्करांना सपोनि वाघमोडेंचा दणका : दोघांवर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत कारवाई
दोन वाळू तस्करांची हर्सूल कारागृहात रवानगी

वादळवार्ता / गौतम बचुटे

वादळवार्ता / गौतम बचुटे
गेवराई तालुक्यातील अवैद्य वाळू उपसा व वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील गुहेगारी आणि वाळू अवैद्य वाळू उपसा करुन त्याची होत असलेली बेकायदेशीर वाहतूक; या संदर्भात प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि त्यांचे सहकारी यांनी कंबर कसली आहे. लखन तुकाराम काळे आणि गोरख सदाशिव काळे यांच्यावर गौण खणीच चोरी, अवैद्य वाहतूक व धमकी देणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी दोघांवर १९८१ चा महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा (एमपीडीए) अर्थात झोपडपट्टी दादा कायदा नुसार कारवाई करण्यात आली. लखन तुकाराम काळे आणि गोरख सदाशिव काळे यांना दि. २७ जुलै रोजी रात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची रवानगी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान वाळू तस्करी करणारा विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांची भीती निर्माण झाली आहे.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.