वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे
केज येथील डॉ. सुभाष खाडे यांच्या रिलीफ फिजिओथेरपी क्लीनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला असून क्लिपच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी परिसरातील रुग्णांसाठी मोफत फिजिओथेरपी उपचार शिबिर आयोजित केले आहे.
शरीरातील हाडांच्या व विविध सांध्यांच्या आणि मणक्यांच्या आजारावर शब्दत्रक्रिया उपचार करूनही पूर्णतः दुरुस्त न होणाऱ्या आजारासाठी डॉ. सुभाष खाडे हे फिजिओथेरपीद्वारे उपचार करीत आहेत.
दि. २० ऑक्टोबर रोजी केज शहरात त्यांनी हे मोफत शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात लकवा, अर्धांगवायु, तोंड वाकडे होणे, चेहऱ्याला लकवा, खांदे दुखी, स्नायु दुखी, स्ट्रेस व स्ट्रेन, मानदुखी, कंबरदुखी, मुल उशीरा चालणे, मनक्यात नस दबणे, हात पायांना मुंग्या येणे, संधिवात, टाचदुखी मणक्याचे आजार यांच्यास स्पोर्ट इनज्युरी, फ्रॅक्चर, मतिमंदता, पोलीओ, बहुविकलांगता तसेच गुडघ्यांचे आजार, सांध्याच्या शस्त्रक्रिये नंतरचे पुनर्वसन, उतारवयातील सांधेदुखी व इतर आजार यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
या साठी त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले असून शिबिराचे ठिकाण हे कानडी रोड, वकीलवाडी हनुमान मंदिरा समोर आहे.