भरपावसातही तिन दिवसापासून अमरण उपोषण सुरुच!
वादळवार्ता वार्तांकन – केज
बलात्कार आणि अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसलेल्या पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांची माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी भेट घेऊन या प्रकरणी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन कारवाई करण्यासाठी मागणी करणार आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यात एका परित्यक्ता महीलेवर एका राजकीय पक्षांचा कार्यकर्ता सुग्रीव कराड याने तिला लग्नाचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचा दोन वेळा गर्भपात केला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात बलात्कार आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यपही आरोपीला अटक झालेली नाही. म्हणून पीडित महिला तिचे वृद्ध आई-वडील यांच्या सोबत ती दि.३० ऑगस्ट पासुन अमरण उपोषणाला बसली आहे.
दरम्यान उपोषणाच्या काल तिसऱ्या दिवशी केज विधानसभेचे माजी आमदार मा.पृथ्वीराज साठे यांनी उपोषणस्थळी अमरण उपोषणास बसलेल्या पीडित महिला आणि तिचे आई-वडील यांची भेट घेतली. या प्रकरणी माजी आमदार पृथ्वीराज साठे हे पोलीस अधीक्षक आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करणार आहेत.
उपोषणाचा तिसरा दिवस; उपोषण कर्त्याचा औषधोपचार व दवाखान्यात भरती होण्यास नकार
पिडीत कुटुंबाचा अमरण उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने पीडितेचे वृद्ध आई-वडील यांची प्रकृती खालावली असून उपोषण कर्त्या पिडित कुटुंबाची डॉक्टर च्या वतीने तपासणी करण्यात आली. व त्यांची प्रकृती खालावली असुन डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती होण्यासाठी विनंती केली. परंतु पिडीत कुटुंबाने औषधोपचारास व भरती होण्यास नकार दिला असल्याने या उपोषणाकडे प्रशासन लक्ष ठेवून आहे.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!