आपला बीड जिल्हाक्राईम

केज पोलिसांच्या अवैद्य दारू आणि मटक्यावर एकाच दिवसात पाच कारवाया

वादळवार्ता वार्तांकन – गौतम बचुटे

गौतम बचुटे/केज :- केज पोलिसांनी अवैद्य धंद्या विरुद्ध कंबर कसली असून एकाच दिवशी पोलीस ठाणे हद्दीत सुरू पाच ठिकाणी सुरू असलेल्या अवैद्य धंद्यावर धाडी टाकल्या

 केज पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी सुट्टी संपताच हजर होताच एकाच दिवसात पाच ठिकाणी अवैद्य धंद्यावर धाडी टाकल्या. त्यात सोमवार दि ३१ ऑक्टोब रोजी सकाळी ११:१० वा च्या सुमारास केज येथिल फुले नगर मध्ये निलाबाई भागवत शिंदे या गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना त्यांच्या ताब्यातील ८० लीटर दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस नाईक आंनद ईनकर यांच्या फिर्यादीवरून गु. र. न. ५०१/२०२२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक उमेश घोलप हे तपास करीत आहेत.

तसेच सकाळी ११:४० वा च्या सुमारास केज येथिल फुले नगर मध्ये सुक्षला भास्कर शिंदे या गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना त्यांच्या ताब्यातील ५० लीटर दारू जप्त केली. या प्रकरणी पोलीस नाईक भागवत निरडे यांच्या फिर्यादी वरून गु. र. न. ५०२/२०२२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक

जसवंत शेप हे तपास करीत आहेत.

त्याच बरोबर सकाळी ९:३० वा च्या सुमारास केज येथिल लव्हुरी येथे अमोल लाला पवार या गावठी हातभट्टीची दारू विक्री करीत असताना त्यांच्या ताब्यातील ३५ लीटर दारू जप्त केली या प्रकरणी पोलीस नाईक उमेश आघाव यांच्या फिर्यादीवरून गु र न ५०३/२०२२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून जोगदंड हे तपास करीत आहेत.

तसेच सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास चिंचोली माळी ते नांदूरघाट रोडवर हॉटेल गारवा येथे विठ्ठल मयूर साबळे अवैद्यरित्या देशी दार दारू विक्री करीत असताना त्यांच्या ताब्यातील ९० मिली च्या १०० बाटल्या जप्त केल्या. या प्रकरणी पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे यांच्या फिर्यादीवरून गु. र. न. ५०४/२०२२ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे तपास करीत आहेत. त्याच बरोबर सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास केज येथिल पंचायत समितीच्या आवारात विजय मच्छिंद्र आरकडे (रा. बोरगाव ) हा कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवीत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याकडील मटक्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस नाईक संतोष गित्ते यांच्या फिर्यादीवरून गु. र. न. ५०५/२०२२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे तपास करीत आहेत.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!