क्राईम

गेवराई शहरात युवकाचा खून

वादळवार्ता वार्तांकन – गेवराई

दोन गटात झालेल्या भांडणात एका युवकाचा खून झाल्याची घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली असून , घटनेचे नेमके कारण समजले नाही . पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असून , आरोपीचा शोध घेतला जात आहे . दरम्यान , सदरील घटना संजयनगर भागातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे . दोन गटात किरकोळ कारणावरून भांडण झाले . भांडणातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली असून , या घटनेत मयत बाबू शिवराम शेलुरे , ( वय वर्ष २४ ) या युवकाचा खून झाल्याचे समजते . दरम्यान , बाबू शेलुरे या युवकाला तिघांनी मिळून मारहाण केल्याची चर्चा आहे .

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!