केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आडस येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या १९९९ च्या इयत्ता दहावी वर्गमित्रांचा स्नेहमिलन सोहळा शुक्रवारी (दि.३०) उत्सहात साजरा करण्यात आला. तब्बल २५ वर्षां नंतर सर्व वर्ग मित्र, मैत्रीण एकत्र आल्या आणि पुन्हा तो वर्ग भरला या धकाधकीच्या आयुष्यात एक दिवस मित्रांच्या आठवणीत आयुष्यभराची परत उर्जा देऊन गेला. यावेळी ज्यांनी शिक्षणाची धडे दिली त्या गुरुजणांसह संस्थेचे सचिव रमेश आडसकर यांची प्रमुख उपस्थितीत होती.
इयत्ता १० वी पर्यंतचे वर्ग मित्र यांना बालमित्र म्हणून ओळखले जाते. ही बालमैत्री म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अमोल ठेवा असतो, त्या आठवणी, ते खेळणं बागडण ही आयुष्यभराची जगण्याची कमाई म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. १० झाली की, मग या एका झाडावरची पाखरं पांगण्यास सुरू होते. कोणी कुठे-कोणी कुठे जात, २५ वर्षांचा कार्यकाळ म्हणजे या काळात प्रत्येकाच्या खांद्यावर कुटुंबाचा भार पडतो, आयुष्यातील धावपळ आणि धकाधकीचे जीवन सुरु होते. पण याही काळात मनाच्या एका कोपऱ्यात शाळेतील त्या आठवणी ताज्या तवाण्या अस्तात. आयुष्यात पुन्हा तो दिवस जगता यावा ही इच्छा असते, तो दिवस काही मित्रांमुळे १९९९ च्या आडस येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या बॅचला जगता आले. या बॅचचे शाळेतच शुक्रवारी (दि.३०) स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. तीन तुकड्यांचे यावेळी १४७ पैकी ११० ते १५ वर्गमित्र वेळात वेळ काढून एकत्र आले. पुन्हा सकाळी ९:३० वाजता शाळेची घंटा वाजली, राष्ट्रगीत झाले. पुन्हा त्याच वर्गात आणि त्याच बाकड्यावर बसण्याचा योग आला, पुन्हा मनातील आठवणींचा पाठ वाहात होऊन डोळ्यातून अश्रू बनून गालावर ओघळून आनंदाचा परमोच्च बिंदू गाठला. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, सर्वांनी त्याकाळी शिक्षणाचे धडे देऊन आयुष्याला आकार आणि जगण्याची शिदोरी दिली असे गुरु माजी मुख्याध्यापक इके आर.एस., मोतिराम सर, ठोंबरे, गदळे, थोरात, अंजान, म्हेत्रे, काळे, खाजगी शिकवणीचे नितीन, गणपत सर यांची तसेच सध्याचे मुख्याध्यापक राजेश देशमुख, लाखे एम.बी. निकते, शिनगारे, बिडवई, इंगोले, पवार, बागवान असे सर्व शिक्षकांची उपस्थिती होती. या सर्व गुरूजनांचा यथोचित सत्कार करुन पुन्हा त्यांच्याकडून मार्गदर्शनाचे धडे घेतले. यानंतर सर्व मित्र, मैत्रिणींनी ओळख करुन दिली. यानंतर दिवसभर, भेंड्या, खुर्ची पकडणं असे विविध खेळ खेळून, आपले मनोगत व्यक्त करीत आठवणी जाग्या केल्या यानंतर सोबत जेवण करून जड अंतःकरणाने निरोप घेतला. पण हा दिवस पुन्हा हा दिवस जगण्याची उर्जा देऊन गेला.
या कार्यक्रमाचे नियोजन आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रा.शिवरुद्र आप्पा आकुसकर ,दिपक कोटे, अनिल आगलावे, महादेव इंगोले,वर्षा बुलबुले,प्रेमला शेंडगे यांनी प्रयत्न केले..
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!