आंदोलनआपला बीड जिल्हाआपले केज

केज नगरपंचायतच्या ढिसाळ कारभाराला वैतागत नगरसेविकाचाच न.प. कार्यालयावर घागर मोर्चा ; सुस्त प्रशासन जागे होईल का ?

 

केज न.प.चे मुख्याधिकारी यांना दिला निवेदनाव्दारे इशारा !

वादळवार्ता वार्तांकन – केज

केज नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका तरमिम बेगम गजमफर इनामदार सध्या केज शहर,तालुक्यात चांगल्याच चर्चेत आहेत त्याचे कारणेही तसेच आाहेत.

सविस्तर वृत्त असे कि केज नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक ११ च्या नगसेविका तरमिम बेगम गजमफर इनामदार आपल्या प्रभागाचा विकास करावा म्हणुन वेळोवेळी सत्ताधार्‍यांशी, प्रशासनाशी लढत,निवेदन, तक्रारी देत आहेत. तसेच जमेल ती कामे स्वखर्चातून करत आहेत.

मात्र केज नगरपंचायतचे सुस्त कर्मचारी, प्रशासन, अनं सत्ताधारी यांच्यात एकमेकांना खो देण्याची पद्धत असलेमुळे तसेच सत्तेमध्ये जनविकास+कॉंग्रेस यांचे एकमेकांना समर्थन असलेमुळे प्रशासनातील कर्मचारी यांना कोणाचे ऐकावे ? कोणाचे नाही ? कोणाचे काम करावे ? कोणाचे नाही ? असा प्रश्न पडलेला आहे ‘ त्याबरोबरच कांही कर्मचारी तर या वैतागामुळे आपली बदली करण्याच्या तयारीत आहेत हे चर्चाअंती समजते. तसेच सत्ताधारी केज नगरपंचायतला निधी मिळविण्यासाठी बड्या बड्या नेत्यांचे ऊबंरे झिझवत असल्याचीही माहिती समोर येतेय.

परंतु प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका यांनी प्रभागाच्या विकासासाठी सुचविलेल्या बांबीनकडे प्रशासन लक्ष देत नसलेमुळे आज रोजी केज न.प.चे मुख्याधिकारी सुहास हजारे यांना प्रभागामधील विकासकामे तात्काळ करा अन्यथा दि.5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. केज नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढुन आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी बीड यांना देखील email निवेदन पाठवण्यात आले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!