आपला जिल्हामाहिती अधिकार

माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

वादळवार्ता – धुळे

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र या संघटने तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्याचे प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित कार्यकर्ते घडवण्याचे कार्य चालते.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघातर्फे उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे एक दिवशीय प्रशिक्षण शिबीर व कार्यकर्ता मेळावा दिनांक – ४ जून २०२३ वार – रविवार रोजी सकाळी – १०. ३० ते ४.०० वाजेपर्यंत, मराठा मंगल कार्यालय, शनी मंदिराजवळ, पिंपळनेर, ता- साक्री, जि – धुळे येथे आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरासाठी नाममात्र १०० रुपये प्रशिक्षण शुल्क आहे. या एक दिवशीय प्रशिक्षण शिबिरात येणाऱ्या कार्यकर्त्यांना चहा, नास्ता व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षण शिबिरास माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर सर मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण शिबिरासाठी श्री. चंद्रभान कोलते, राज्य कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, श्री. साहेबराव वाघ, राज्य कार्यकारणी सदस्य, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, श्री. महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या प्रशिक्षण शिबिरात माहिती अधिकार क्षेत्रात काम करीत असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, जण माहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडून अर्जदारास माहिती वेळेत दिली जात नाही ती माहिती वेळेत कशी उपलब्ध करून घ्यावी, तसेच माहिती अधिकार कायद्यात झालेल्या नवीन सुधारणा, कायदे, शासनाचे नवीन परिपत्रके, या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशिक्षणास धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर येथील कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण शिबिरास व कार्यकर्ता मेळाव्यास हजर राहावे, अधिक माहिती साठी प्रवीण थोरात, साक्री तालुका कार्याध्यक्ष, मो. न – ८६६८७९१९७९ यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन महेश पाटील, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, यांनी केले आहे.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!