वादळवार्ता – गौतम बचुटे
अंगावरील पोलिसांच्या खाकी वर्दीचे सर्वांना आकर्षण असते; मात्र ती खाकी वर्दी अंगावर चढविण्यासाठी प्रचंड मेहनत, परिश्रम आणि अभ्यासातील सातत्य हे महत्वाचे असते. त्या कसोटीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेले निलेश बचुटे यांनी यश मिळवले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा साळेगांव येथील सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे यांनी केले.
केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील मोलमजुरी करणाऱ्या एका अत्यंत गरीब कुटुंबातील निलेश बचुटे याची पी.एस.आय. म्हणून निवड झाली आहे. निलेशने वाढपी केटरर्स म्हणून देखील काम केलेले आहे. परंतु मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर निलेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फौजदार या पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशा बद्दल साळेगांव येथे दि. ११ ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कादरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या वेळी माजी सरपंच सय्यद नूर साहेब, बालासाहेब पारखे, ज्योतिराम बचुटे, रवींद्र जोगदंड, अशोक गित्ते, श्रीमंत गित्ते, संभाजी सरवदे, लिंबाजी बचुटे, अनिल महाजन, पत्रकार गौतम बचुटे, मधुकर पुरी, ॲड. बाळासाहेब मुळे, रोशन सरवदे, लक्ष्मण ओव्हाळ, अविनाश सरवदे, रोहित बचुटे, अशोक बचुटे, बलभीम बचुटे, शाम बचुटे, बबलू बचुटे, मयूर बचुटे, मोहित बचुटे, यश बचुटे, ऋषीकेश सरवदे, बबन तिडके, कैलास सरवदे, अभिजित बचुटे, गुलाब गालफाडे, यांच्यासह गावातील नागरिक मोठया संख्येने स्थित होते.
निकालाच्या दिवशीही केले केटरिंगचे काम ! निलेश बचुटे यांनी ज्या दिवशी त्याची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचा निकाल लागला त्या दिवशी सुद्धा त्याचे केटरिंगचे काम सुरू होते असे त्याने सत्काराला दिलेल्या उत्तरा वेळी सांगितले आणि त्याची परिस्थिती व मेहनत हे सांगत असताना उपस्थित अगदी निस्तब्ध होऊन ऐकत होते.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!