सततचा पाऊस सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या साथी आणि संसर्गजन्य आजार डोके वर काढतात. आता जाईल, नंतर जाईल असे म्हणत ताप अंगावर काढला जातो. मात्र पहिले काही दिवस हे अतिशय महत्त्वाचे असतात. याच दिवसामध्ये आजाराचे नेमके निदान होते. त्यामुळे स्वतःच घरच्याघरी वा गुगलच्या माध्यमातून वैद्यकीय निदान करू नये. ताप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तापाचे नेमके निदान काय आहे, याकडे पाहून वैद्यकीय उपचार घेतले तर प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होते.
डेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य ताप, टायफाइड, लेप्टो. असे विविध प्रकारचे आजार पावसाळ्यामध्ये डोके वर काढतात. त्यांच्या वैद्यकीय निदान चाचण्या झाल्यानंतर या आजारांच्या निदानानुसार उपचार सुरू करता येतात. पावसाळ्यामध्ये दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब हा सुद्धा सर्वसाधारणपणे दिसून येणारा त्रास असतो. यासाठीही काही साधी आरोग्याची पथ्ये पाळली तर पावसाळी आजारांमधील हे त्रास हमखास आटोक्यात ठेवता येतील. पाणी उकळून पिणे, उघड्यावरचे पदार्थ न खाणे या साध्या गोष्टी करणे गरजेचे आहे. पाणीही उकळल्यावर ते सहा ते सात मिनिटे चांगले उकळून गार करून प्यायला हवे. आश्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे आहे .
अश्या पद्धतीने नियोजन कामे करा
– ताप वा कोणत्याही प्रकारच्या आजाराचे योग्यवेळी निदान व्हायला हवे.
– औषध विक्रेते किंवा इतर कोणाकडूनही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.
– डॉक्टरने सांगितलेल्या वैद्यकीय तपासण्या योग्यवेळी करून घ्या
– ताप कमी झाला म्हणजे ताप गेला नाही, ताप येण्यासाठी कोणती कारणे आहेत हे जाणून घेणे गरजेचे
– पाणी तुंबल्यानंतर लेप्टो होण्याचा धोका असतो त्यामुळे साठलेल्या पाण्यातून चालणे टाळावे
– पावसाळ्याबरोबर गॅस्ट्रो, कॉलरा आणि लेप्टोचे रुग्ण वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दूषित पाणी पिणे टाळावे
– डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा
– पावसाळ्यामध्ये पचायला जड आहार घेतला तर तब्येत बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे पोषक आहार घ्यावा.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!