आपला बीड जिल्हाआपले केजक्रीडा

पवनराजे इंग्लिश स्कूल येथे क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने विविध खेळाचे आयोजन संपन्न

विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग

वादळ©वार्ता – केज

शालेय जीवनात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येतो , त्यातुनच त्याचा सर्वांगीन विकास साधला जातो मग सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रिडा क्षेत्रातील मैदानी खेळ असो त्यातुनच साधला जातो तो विकास.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि केज येथील नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा पवनराजे इंग्लिश स्कूल केज येथे दोन दिवशीय क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष चौरे सर यांनी करून विविध खेळांना क्रिडा प्रमुख विनोद गुंड सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली त्यामध्ये पंन्नास मिटर धावणे , कबड्डी , खो- खो, बुद्दीबळ , योगा , हॉलीबॉल, रस्सीखेच , फ्रॉग जंप, लेमन अँन्ड स्पुन , सॅकरेस, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन , टेबल टेनीस आदि स्पर्धा घेण्यात आल्या.

 सदरील स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत उस्फूर्त सहभाग नोंदवुन नेत्रदिपक कामगिरी केली.

या स्पर्धेकरिता पवनराजे इंग्लिश स्कूलचे प्रिन्सिंपल अशोक मस्के,प्रिन्सिंपल अजय भांगे , प्रिन्सिंपल घुले सर ,प्रिन्सिपल चौरे मॅडम, विशाल सिरसट सर, मुंडे सर , पंकज घुले सर , डि.एस. चौरे सर , एस.एन. चौरे सर , अमोल खाडे सर , सुहास काळे सर , वायबसे सर , महेश राऊत सर , घाडगे मॅडम , सिद्धार्थ शिनगारे सर , स्नेहा मॅडम, सपना मॅडम , निकिता मॅडम, बचुटे मॅडम, पुजा मॅडम, सपाटे मॅडम , कसबे मॅडम , आयशा शेख मॅडम, गालफाडे मॅडम आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!