वादळवार्ता वार्तांकन – गणेशभाऊ ढाकणे
श्री क्षेत्र मोहटादेवी संस्थानचे दोन कर्मचारी मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
हा अपघात हंडाळवाडी शिवारातील वृध्देश्वर तालुका सहकारी दुधसंघा जवळ झाला.यामध्ये मोहटा देवस्थान संस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे (दोघेही रा.मोहटादेवी गड) या दोघांचा समावेश आहे.
दोन्ही कर्मचारी आपली ड्युटी संपल्यानंतर पाथर्डीकडे येत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दूधडेअरी जवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात एवढा भयंकर होता की, एका कर्मचार्याचे मुंडके धडावेगळे झाले. घटनेनंतर दोघांना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे यांच्यासह आदी कर्मचारी उपस्थित होते.
या घटनेने मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे. देवस्थान समितीच्या कर्मचार्यांमध्ये मोठी शोककळा परसली आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून चारचाकी वाहन चालक फरार झाला असून यावेळी काही प्रत्यक्षदर्शींनी गाडीचा नंबर घेतला असून त्याआधारे पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!
Back to top button
error: Content is protected !!