आपला बीड जिल्हा

नाव्होली येथील दुचाकीला अज्ञात वाहानाने जोराची धडक दिल्याने पती-पत्नी गंभीर!

(छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू!)

वादळवार्ता – महादेव काळे

अलीकडच्या काळात अपघाताच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच काल शिरुरघाट जवळ रात्री झालेल्या अपघातात नाव्होली येथील राजेंद्र शिंदे आणि त्यांची पत्नी मिरा या दवाखान्यातुन गावाकडे येत असताना त्यांना अज्ञात वाहानाने समोरुन जोराची धडक दिल्याने हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असुन त्यांचेवर छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बाबत समजलेल्या माहिती नुसार केज तालुक्यातील नाव्होली येथील चर्मकार समाजातील आणि अतिशय गरिब कुटूंबातील उसतोड मजुर पती-पत्नी श्री.राजेंद्र लिंबाजी शिंदे वय ४५ वर्षे आणि पत्नी सौ. मिराबाई राजेंद्र शिंदे वय ३७ वर्षे हे कुटुंबात दोघेच असुन त्यांना एकही अपत्ये नाही. ते गेल्याच आठवड्यात ऊसतोडणी करुन गावी नाव्होली येथे आले होते. राजेंद्र शिंदे यांच्या पत्नी मिराबाई या आजारी असल्याने राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या पत्नी सौ. मिराबाई यांना दि.२१ मार्च मंगळवार रोजी नांदूरघाट येथे दवाखान्यात घेवुन गेले होते. त्यांना दवाखान्यात औषधोपचार करण्यास उशीर झाल्याने रात्री ८ ते ८:३० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावी नाव्होली येथे आपल्या दुचाकीवरून पत्नी मिराबाई शिंदे यांना घेवुन येत असताना शिरुरघाटच्या जवळ आले असता यावेळी खुप अंधार असल्याने एका अज्ञात वाहानाने श्री. राजेंद्र शिंदे यांच्या दुचाकीला समोरुन जोराची धडक दिली. यात राजेंद्र लिंबाजी शिंदे आणि त्यांची पत्नी मिराबाई शिंदे हे दोघे पती पत्नी गाडीवरून पडले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात या दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली असुन रसत्यावर अंधार असल्याने त्यांना कोणीही थांबत नव्हते.ते दोघेही मदतीसाठी एक तास आरडाओरडा करत होते. तरी त्यांच्या मदतीला कोणीही आले नाही . परंतु शिरुघाटचे माजी सरपंच पोपट जाधव यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता राजेंद्र शिंदे हे ऊत्रेश्वर शिंदे यांचे भाऊ आणि नाव्होलीचे असल्याचे समजताच पोपट जाधव यांनी नांदूरघाट येथील माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव गोंद्रे यांना सदरची घटना सांगतली. गोंद्रे यांनी ही.घटना नांदूरघाट येथील सामाजिक कार्यकर्ते आणि अंकुर सामाजिक संस्थेचे सचिव ऊत्रेश्वर शिंदे यांना हि माहिती सांगतली. व हे कोणी आपले नाव्होलीचे नातेवाईक आहेत काय ? असे विचारल्यावर त्यांनी नातेवाईक नाहीत असे सांगितले. परंतु त्यांनी हि माहिती नाव्होली येथील दैनिक लोकनायकचे पत्रकार महादेव काळे यांना सांगतली.त्यावर पत्रकार काळे यांनी घटनेची खातरजमा करुन शिरूरघाट येथील प्रा.जगन्नाथ मिसळे सर यांचेशी फोनवरून संपर्क साधला.

आणि या अपघाताची माहिती देवुन या अपघातग्रस्त पती- पत्नीला मदत करण्यासाठी सांगतले. प्रा. मिसळे सर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहिले असता हे पती पत्नी मदतीसाठी पंचेचाळीस मिनिटे ओरडत होते. आणि नंतर ते बेशुद्ध पडले होते. या अपघाताबाबत चौकशी करत न बसता त्यांनी शिरुरघाट येथील शेखर कुरुंद यांची गाडी बोलावून त्यांच्या गाडीतून नांदूरघाटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोपर्यंत पत्रकार काळे यांनी नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कदम यांचेशी संपर्क साधून अपघात ग्रस्तावर उपचार करण्यास सांगितले. या ठिकाणी कर्त्यव्यावर असणाऱ्या वै.अधिकारी डॉ. नागरगोजे मॅडम यांनी तात्काळ प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी बिड जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्या ठिकाणी उपचार करुन मंगळवार रोजी सकाळी अपघातात जखमी झालेले पती पत्नी यांना छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असुन त्यांच्या दोघांच्या ही डोक्याला गंभीर मार लाल्याने आणि मोठ्याप्रमाणात रक्तस्राव झाल्याने ते दोघेही कोमात गेले असल्याचे कळाले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले आहे. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या पतीपत्नीला मदतीची आवश्यकता असुन दानशुरांनी मदत करावी. असे अवाहन त्यांचे बंधु ऊत्रेश्वर शिंदे यांनी केले आहे..

संपादक अजय भांगे

नमस्कार, वादळ वार्ता परिवारामध्ये आपले स्वागत. वादळ वार्ता च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही. आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9422660077 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता......धन्यवाद....!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!